Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
महाज्योतीकडून JEE, NEET व MHT-CET साठी मोफत प्रशिक्षण; अर्ज प्रक्रिया सुरू महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET व MHT-CET 2026-28 परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण योजना जाहीर […]
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्रक्रिया सुरू महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी विदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2026-27 वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक मोठी संधी मानली जात आहे. […]
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अनेकदा वैयक्तिक गरजांसाठी किंवा उच्च शिक्षण, आरोग्य, विवाह, घर दुरुस्ती तसेच लहान व्यावसायिक उपक्रमांसाठी, कर्ज घेणे आवश्यक ठरते. परंतु त्यावरील व्याजाचा भार सामान्य नागरिकांना परवडणारा नसल्याने व कर्जाचे डोंगर मोठे होत असल्याने ते परतफेड करण्यात अनेक अडचणी येतात. याच समस्येवर तोडगा […]
इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी सक्षमीकरण व स्वयंरोजगार योजना समाजातील महिलांचे सक्षमीकरण हा सामाजिक न्यायाचा पाया आहे. इतर मागास प्रवर्गातील (OBC) महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संधी वाढवून त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा एक प्रभावी उपक्रम आहे. योजनेचा उद्देश या योजनेद्वारे इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परित्यक्ता […]
मंडल आयोग ओबीसी मुक्तीचा जाहीरनामा आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातून जात असताना इतर मागासवर्गाच्या संदर्भात १९७८ मध्ये गठीत मंडल आयोगाची व त्याच्या संघर्षाची निश्चितच आठवण येते. आजच्याच दिवशी ७ ऑगस्ट १९९० ला मंडल आयोग इतर मागास प्रवर्गातील समुदायाला लागू करण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केली. निमित्ताने या दिवसाची आठवण म्हणून देश […]
खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज भरणे सुरू विविध अभ्यासक्रमातील २० विद्यार्थ्यांना संधी, अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट संघटना प्रतिनिधी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे (Department of Higher and Technical Education) दर वर्षी खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालयांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा असे या […]
शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादेत वाढ करा ओबीसी मंत्री अतुल सावेकडे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची मागणी संघटना प्रतिनिधी – राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (Post Matric Scholarship Scheme) (१०० टक्के केंद्र पुरस्कृत) योजनेत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची मागणी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाने निवेदनाद्वारे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे […]
ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना संघटना प्रतिनिधी – इतर मागास वर्ग (OBC), भटके विमुक्त जाती व जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे. व त्यांच्यात उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (Post-Matric Scholarship Scheme) २००३ पासून लागू करण्यात आली. या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात […]
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना देशांतर्गत १० लाख तर परदेशाकरिता २० लाख लाखापर्यंतचे कर्ज संघटना प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मर्यादित यांच्यामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना (Student) शिक्षणासाठी बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज (Education Loan) […]
ऑगस्टअखेर राज्यात संघटना विस्तार ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांचा निर्धार संघटना प्रतिनिधी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचा विस्तार ३१ ऑगस्ट अखेर पर्यंत संपूर्ण राज्यात करणार असल्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाईन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 2