Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे (Department of Higher and Technical Education) दर वर्षी खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालयांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील २० गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना (Foreign Education Scholarships) वर्ष २०१८ पासून दिली जाते. वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता १२ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता त्याला मुदतवाढ दिली असून, १३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. या मुदतीपर्यंत ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांसह सहसंचालकांकडे १४ ऑगस्ट पर्यंत सादर करणे अनिवार्य असणार आहे.
ज्या उमेदवारांनी कला, वाणिज्य, विज्ञान व विधी शाखेंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे. त्यांनी उमेदवार वास्तव्यास असलेल्या जिल्हाशी संबंधित सहसंचालक, विभागीय कार्यालय, उच्च शिक्षण येथे कागदपत्रे सादर करायचे आहेत. तर ज्या उमेदवारांनी व्यवस्थापन, अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र व औषधनिर्माणशास्त्र शाखेंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे. त्यांनी उमेदवार वास्तव्यास असलेल्या जिल्हाशी संबंधित सहसंचालक, विभागीय कार्यालय, तंत्र शिक्षण येथे कागदपत्रे सादर करायचे आहेत.
संबंधित शिष्यवृत्ती ही ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ THE (Times Higher Education) किंवा ‘क्यू एस रँकिंग’ QS (Quacquarelli Symonds) मध्ये समाविष्ट असलेली महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळू शकणार आहे. इतर कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू होणार नाही, असेही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शिष्यवृत्ती कोणाला लागू होते?
अर्ज कसा करावा?
कोणकोणत्या क्षेत्रासाठी लागू?
शिष्यवृत्तीसाठी अटी
लाभाचे स्वरूप पुढीलप्रमाणे
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Post a Comment