Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET व MHT-CET 2026-28 परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत पूर्णतः मोफत ऑनलाईन प्रशिक्षण तसेच टॅब (Tablet) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाज्योतीची ही योजना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण, डिजिटल साधने आणि मार्गदर्शन उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे JEE, NEET आणि MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीची ही योजना मोठी संधी असून, पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्चारी संघच्यावतीने करण्यात येत आहे.
या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
* विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा* OBC, VJ, NT किंवा SBC प्रवर्गातील असावा
* नॉन-क्रिमिलेअर गटातील असणे आवश्यक
* सन 2026 मध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक * अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा
* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 60% गुण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 70% गुण आवश्यक आहेत.
अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे:
* आधार कार्ड
* रहिवासी दाखला (Domicile)
* जात प्रमाणपत्र
* वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
* दहावी गुणपत्रिका
* दिव्यांग / अनाथ असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या योजनेत सामाजिक व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे लागू आहे:

इच्छुक विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा: www.mahajyoti.org.in
* किंवा “Application for JEE/NEET/MHT-CET Batch 2026-28 Training” या टॅबवर क्लिक करून अर्ज भरावा.
* सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे 2026 निश्चित करण्यात आली असून, ई-मेल किंवा पोस्टाद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज प्रक्रियेसंदर्भात अडचण आल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटरशी संपर्क साधावा: 0712-2870120 / 21 किंवा अधिक माहीतीसाठी संघटनेच्या प्रतिनिधीशी 8796455216 या क्रंमाकावर संपर्क साधावा.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 5
2 Replies to “महाज्योतीकडून JEE, NEET व MHT-CET साठी मोफत प्रशिक्षण; अर्ज प्रक्रिया सुरू”
Yogita Ravindra Vyapari
09 May 2026You are doing good work
Ram Wadibhashme
09 May 2026Thank you for your appreciation.