Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी –
इतर मागास वर्ग (OBC), भटके विमुक्त जाती व जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे. व त्यांच्यात उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (Post-Matric Scholarship Scheme) २००३ पासून लागू करण्यात आली. या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविले जातात.
योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे. पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना बनविण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क (Tution Fee), परीक्षा शुल्क (Exem Fee) आणि देखभाल भत्ता (Maintenance Allowance) यांचा लाभ फक्त इतर मागास वर्ग (ओबीसी), भटके विमुक्त जाती व जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) वर्गातील विद्यार्थ्यांना दिला जातो.
जर अर्जदाराने अभ्यासक्रम गट अ निवडला – वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी ४२५ रु. प्रती महिना आणि वसतिगृहात न राहणाऱ्यांसाठी १९० रु. प्रती महिना (कालावधी – प्रवेश तारीख ते परीक्षा पूर्ण होईपर्यंत) रक्कम मिळणार आहे.
जर अर्जदाराने अभ्यासक्रम गट ब निवडा – वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी २९० रु. प्रती महिना आणि वसतिगृहात न राहणाऱ्यांसाठी १९० रु. प्रती महिना (कालावधी – प्रवेश तारीख ते परीक्षा पूर्ण होईपर्यंत) रक्कम मिळणार आहे.
जर अर्जदाराने अभ्यासक्रम गट क निवडला तर – वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी २९० रु. प्रती महिना आणि वसतिगृहात न राहणाऱ्यांसाठी१९० रु. प्रती महिना (कालावधी – प्रवेश तारीख ते परीक्षा पूर्ण होईपर्यंत) रक्कम मिळणार आहे.
जर अर्जदाराने अभ्यासक्रम गट ड निवडला तर – वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी २३० रु. प्रती महिना आणि वसतिगृहात न राहणाऱ्यांसाठी १२० रु. प्रती महिना (कालावधी – प्रवेश तारीख ते परीक्षा पूर्ण होईपर्यंत) रक्कम मिळणार आहे.
जर अर्जदाराने अभ्यासक्रम गट ड निवडला तर – वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी १५० रु. प्रती महिना आणि वसतिगृहात न राहणाऱ्यांसाठी ९० रु. प्रती महिना (कालावधी – प्रवेश तारीख ते परीक्षा पूर्ण होईपर्यंत) रक्कम मिळणार आहे.
शासकीय/अनुदानित/विना-अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा ५० टक्के लाभ मिळतो.
शासकीय/अनुदानित संस्थेतुन व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा १०० टक्के लाभ प्रदान करण्यात येईल.
खाजगी/विना-अनुदानित संस्थेतून व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांचा ५० टक्के परतावा आणि देखभाल भत्त्याचा १०० टक्के लाभ प्रदान करण्यात येईल.
शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एकूण शुल्क रक्कमेच्या फक्त एक तृतीयांश रक्कमेचा परतावा प्राप्त होईल.
खाजगी विना-अनुदानित संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय अनुदानित संस्थेतील शुल्क संरचनेवर आधारित शुल्क परतावा प्रदान करण्यात येईल.
अर्जदार विशिष्ट व्यावसायिक/बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असेल, आणि त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी त्याला/ तिला शिष्यवृत्ती (Scholarship)/ फ्रिशिप (Freeship) मिळाल्यानंतर त्याच शैक्षणिक वर्षात काही कारणास्तव त्याने/तिने वर्तमान व्यावसायिक/बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून घेतल्यास, त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती (Scholarship)/ फ्रिशिप (Freeship) प्रदान केली जाणार नाही.
बी.एड आणि डी.एड अभ्यासक्रमांसाठी : या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना १००टक्केवलाभ प्रदान करण्यात येईल. (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता). अनुदानित, विना अनुदानित संस्थेतून डी.एड आणि बी.एड अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी शासकीय नियमानुसार असलेले शुल्क संरचनेप्रमाणे शुल्क परतावा प्रदान करण्यात येईल.
टीप: अर्जदाराने कोणत्याही महिन्याच्या २० तारखेपर्यंत प्रवेश घेतला असेल, तरच त्याला त्या महिन्याचा देखभाल भत्ता प्रदान केला जाईल. अन्यथा देखभाल भत्ता पुढील महिन्यापासून अनुज्ञेय राहील.
पालकांचे वार्षिक उत्पन्न दिड लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
अर्जदार हा इतर मागासवर्गीय श्रेणीतील असावा.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी शालान्त पूर्व श्रेणीमध्ये शासनाकडून मंजूर केलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा पाठपुरावा केला पाहिजे.
जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षाचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल. परंतु पुढील उच्च श्रेणीत त्याला बढती मिळत नाही. तोपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंडच्या (Cap Round) माध्यमातून येणे आवश्यक आहे.
केवळ दोन अपत्य (i) मुलींसाठी हि अट बंधनकारक नाही. ii) एकाच पालकची जास्तीत जास्त २ मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
दुसरी कुठलीही शिष्यवृत्ती/वेतनरोख स्विकारल्यास या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतर्गत अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
चालू वर्षासाठी ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
अर्जदाराने व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र नसेल. परंतु, बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
सुरू असलेला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत, अर्जदाराची शिष्यवृत्ती/फ्रीशिप चालू राहील. उदाहरणार्थ – ११ वी, १२ वी कला – बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी.,इत्यादी. अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. पूर्ण केले तर आणि नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यानंतर, एम.ए. अभ्यासक्रमासाठी अर्जदाराला शिष्यवृत्तीसाठी परवानगी दिली जाणार नाही. पण बी.एड. नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश केल्यानंतर ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
विशेष व्यावसायिक/बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती/फ्रीशिपचा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
अर्जदाराने मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, अर्जदार एखाद्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी कोणत्याही प्रकारचा लाभ प्राप्त होणार नाही.
गट अ साठी-फक्त गट अ मधील अभ्यासक्रमात शिकणाऱ्या अर्जदारासाठी फक्त पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यास शुल्क परतावा नूतनीकरण उपलब्ध असेल. दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात कोणत्याही वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत अर्जदारास खर्च स्वतः करावा लागेल.
गट ब, क, ड, ई साठी – अर्जदार पुढील उच्च श्रेणीत बढती मिळणे आवश्यक आहे. (दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात कोणत्याही वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत अर्जदारास खर्च स्वतः करावा लागेल)
इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे अथवा कोणत्याही अपवादात्मक घटनेमुळे अर्जदार वार्षिक परीक्षेत बसू न शकल्यास, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणित असणे आवश्यक आहे कि, संबंधित विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षा दिली असती तर तो/ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला असता. अर्जदाराने महाविद्यालयाकडे सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे याबाबत संस्थेचे प्रमुख आश्वस्त झाले तरच त्याबाबत मान्यता मिळेल.
जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे. (महाराष्ट्र शासनाद्वारे जारी केलेले) वास्तव्याचा पुरावा म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
उत्पन्न प्रमाणपत्र/मिळकत घोषणापत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
जात पडताळणी प्रमाणपत्र – व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य. बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य नाही.
१० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका.
अंतर प्रमाणपत्र – शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
वडिलांचे/पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास).
शिधापत्रिका – कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी.
शाळा/महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र.
एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे/पालकांचे घोषणापत्र
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 10
Post a Comment