Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचा विस्तार ३१ ऑगस्ट अखेर पर्यंत संपूर्ण राज्यात करणार असल्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाईन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून सुनील शेळके बोलत होते.
यावेळी राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात संघटनेचा संपूर्ण राज्यात विस्तार करुन सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान राज्याचा दौरा केंद्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर संघटनेचे अधिवेशन घेणार असल्याची घोषणा ही त्यांनी यावेळी केली. बैठकीला उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी व विभागीय अध्यक्ष यांनी आपल्या कामकाजाचा आढावा शेळके यांच्याकडे सादर केला.
दरम्यान राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांनी सर्व विभागीय अध्यक्षांची नियुक्ती करुन मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करून सर्व स्तरावर याबाबत प्रचार प्रसार करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. तसेच यावेळी सर्वानुमते केंद्र व राज्यस्तरीय मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी शिष्टमंडळ नियुक्त करून मंत्र्यांच्या भेटी घेणार असल्याचे ठरविण्यात आले.
यावेळी संजीव खांडवे, संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, विजय केसरकर, धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर चौधरी, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, वाशीम जिल्हा प्रभारी केशव गिरहे, हिंगोली जिल्हा प्रभारी रवींद्र सांगळे, धाराशिव जिल्हा प्रभारीभास्कर कांबळे, परभणी जिल्हा प्रभारी उमाकांत विभूते, अहमदनगर जिल्हा प्रभारी रामदास डोईफोडे, नंदुरबार जिल्हा प्रभारी रवींद्र देवरे, नाशिक जिल्हा प्रभारी नंदकिशोर पाचपुते, बीड जिल्हा प्रभारी शिवप्रसाद जटाले, जालना जिल्हा प्रभारी आकाश मौर्य, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी संतोष ताठे, दामोधर दहले, शशिकांत लोलगे, अनिल मसने व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.

Post a Comment