Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी विदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2026-27 वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक मोठी संधी मानली जात आहे. या अंतर्गत एकूण ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. Other Backward Bahujan Welfare Department Foreign Scholarship Year 2026-27
ही योजना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (OBC) घटकातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध करून देते. आर्थिक अडचणीमुळे परदेशात शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक उज्ज्वल भविष्याचा मार्ग ठरू शकते. महाराष्ट्र शासनाची ही विदेशी शिष्यवृत्ती योजना ही केवळ आर्थिक मदत नसून, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या दारात प्रवेश मिळवून देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघच्यावतीने करण्यात आले आहे.
या शिष्यवृत्ती अंतर्गत विविध शाखांमध्ये खालीलप्रमाणे जागा निश्चित करण्यात आल्या आहेत:

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
इच्छुक विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे अर्ज करावा:
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: 21 मे 2026 (सायं. 6:15 पर्यंत)
अधिक माहितीकरीता संघटनेच्या प्रतिनिधी सोबत 8796455216 या क्रमांकावर संंपर्क साधावा.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 41
4 Replies to “इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्रक्रिया सुरू”
Damodar Dahale
27 Apr 2026This is an important scholarship for OBC students.
Thanks to OBC ADHIKARI KARMACHARI SANGH.
Ram Wadibhashme
27 Apr 2026Thank You for Your Comment.
vaishnavi pravin dudhal
28 Apr 2026i want to britten my future by international degreee
Ram Wadibhashme
29 Apr 2026Yes, definitely study abroad. We wish you the best. If you need any help, we are here.