Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
अनेकदा वैयक्तिक गरजांसाठी किंवा उच्च शिक्षण, आरोग्य, विवाह, घर दुरुस्ती तसेच लहान व्यावसायिक उपक्रमांसाठी, कर्ज घेणे आवश्यक ठरते. परंतु त्यावरील व्याजाचा भार सामान्य नागरिकांना परवडणारा नसल्याने व कर्जाचे डोंगर मोठे होत असल्याने ते परतफेड करण्यात अनेक अडचणी येतात. याच समस्येवर तोडगा म्हणून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्यावतीने सुरू करण्यात आलेली योजना म्हणजेच “वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना”. ही योजना विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना कर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी तयार करण्यात आली असून, वेळेवर हप्ते भरणाऱ्या अर्जदारांना म्हणजेच, जर आपण बॅंकेचे हप्ते वेळेवर भरले, तर महामंडळाच्या माध्यमातून १२ टक्के पर्यंत व्याज परतीचा मोठा लाभ मिळतो.
योजनेचा उद्देश:
व्यक्तींना आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
वेळेवर हप्ते भरण्यास प्रोत्साहन देणे.
कर्जावरील व्याजाचा भार कमी करणे.
अल्प उत्पन्न गटातील लोकांना आर्थिक स्थैर्य देणे.
योजनेचा तपशिल:
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ ही योजना राबविते. या योजनेअंतर्गत योजनेची कर्ज मिळण्याची मर्यादा रु. १५.०० लक्ष पर्यंत आहे.
उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्केच्या मर्यादेत) त्याचा आधार लिंक बॅंक खात्यात दरमहा महामंडळामार्फंत जमा करण्यात येतो. सदर योजना पुर्णपूणे संगणकीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पी एफ एम एस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. महामंडळ केवळ बॅंकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल, या ऐवजी इतर कोणतेही Charges/Fees अदा करणार नाही.
कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य राहील. वेबपोर्टल – (www.vjnt.org)
कर्ज परतफेडीचा कालावधी बॅंक निकषानुसार आहे.
अर्जदाराने महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करुन घ्यावे.
अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेयरच्या मर्यादेत आहे (सद्यस्थितीत ८ लाख रुपये).
अर्जदाराची पात्रता:
१लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
लाभार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:
शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा पुरावा (वय मर्यादा १८ ते ५० वर्षे असावी.)
सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा दाखला
सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
रेशनकार्ड झेरॉक्स
आधार कार्ड झेरॉक्स
नागरीकत्व (Domicile Certificate) / रहिवासी दाखला.
व्यवसायाचे दरपत्रक (Quotation)
वाहनसंदर्भात असल्यास लायन्संस/परवाना
महिला अर्जदार यांचे लग्न झाले असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा माहेरच्या व सासरच्या नावांतील बदलाचे अॅफेडिव्हीट जोडावे.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 5
2 Replies to “विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना”
Sambhaji vitthal kumbgar
24 Nov 2025माझे ओबीसी महामंडळ कर्ज फाईल मंजूर झाली आहे पण बँका वाटप करीत नाहीत
Ram Wadibhashme
24 Nov 2025Please Call me on this Contact Number 8796455216.