Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
पर्यटन विकासासाठी फेलोशिप; तरूणांना संधी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ मे; एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम संघटना प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे […]
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात विविध पदांची भरती पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार; अर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ मे संघटना प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या पदभरतीत पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकाधारकांना संधी मिळणार आहे. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शुद्धीपत्रक जारी करुन शैक्षणिक अर्हतेत पदव्युत्तर पदवी […]
राज्यात दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार तर महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय संघटना प्रतिनिधीमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दिव्यांग, विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी, महिलंना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र यांसह इतर विविध निर्णय घेण्यात आले. काय […]
महाज्योती संशोधक विद्यार्थी आंदोलनाला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचा जाहीर पाठिंबा संघटना प्रतिनिधीछत्रपती संभाजीनगर : महाज्योतीतर्फे संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. छात्रवृत्तीची (MJPRF) रक्कम महाराष्ट्र सरकाकडून पात्र १२२६ विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. तसेच ही योजना विद्यापीठात पी.एच.डी. नोंदणी दिनांकापासून मिळण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक न्याय विभाग कार्यालयासमोर गेल्या सोमवार पासून आमरण उपोषण सुरु […]
नॉन-क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी लोकचळवळ उभारू महासचिव राम वाडीभष्मे : चिंतन शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटना प्रतिनिधीधुळे : दर तीन वर्षानी नॉन क्रिमिलेअरच्या उत्पन्न मर्यादेत वाढ व्हायला हवी, पण गेल्या सात वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे ही असंविधानिक नॉन-क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी लोकचळवळ उभारू, असे प्रतिपादन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे महासचिव राम वाडीभष्मे यांनी […]
संविधानिक अधिकारासाठी ओबीसीनी एकत्र येण्याची गरज महासचिव राम वाडीभष्मे : चिंतन शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटना प्रतिनिधीमुक्ताईनगर : मंडल आयोगाने केलेल्या शिफारशींच्या माध्यमातून मिळालेल्या संविधानिक अधिकारासाठी ओबीसीनी एकत्र येण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने येत्या ९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची चिखली व मेहकर आढावा बैठक संपन्न नवनियुक्त तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन संघटनेच्यावतीने येत्या ९ एप्रिला छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित चिंतन शिबिराच्या अनुषंगाने चिखली व मेहकर तालुका येथे आढावा बैठीक संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे व जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. दरम्यान दोन्ही तालुक्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन […]
बहुजन मंत्रालय बनले मात्र ओबीसी न्यायाच्या तरतुदीला गळती का? राज्य सरकारने ९ मार्चला संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या, ‘पीकवावे धन, ज्याची आसकरी जन’, या ओवीने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु, ज्याची आस ओबीसीने अर्थसंकल्प संदर्भात केली होती, त्याची परतफेड तर सोडाच पण गत वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ओबीसी कल्याणला गळती लागल्याचे दिसून येते आहे. सरकारने […]
MHT-CET/JEE/NEET 2025 करिता अर्ज भरणे सुरू राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उन्नत गटात मोडत नसलेल्या विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. परिक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना […]
राज्य आयोगाच्या मुलाखतीसाठी कोरोना काळातील नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची गरज नाही संघटना प्रतिनिधी : कोविद्ध-१९ (कोरोना) च्या पार्श्वभूमीवर मार्च, २०२० पासून शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसलेल्या उमेदवारांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्रे मिळविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे, उमेदवारांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याने आयोगाच्या मुलाखती दरम्यान सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या वर्षाचे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची मागणी न करता, […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.