Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाज्योतीतर्फे संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. छात्रवृत्तीची (MJPRF) रक्कम महाराष्ट्र सरकाकडून पात्र १२२६ विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. तसेच ही योजना विद्यापीठात पी.एच.डी. नोंदणी दिनांकापासून मिळण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक न्याय विभाग कार्यालयासमोर गेल्या सोमवार पासून आमरण उपोषण सुरु आहे. या लढवय्या विद्यार्थ्यांना ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जाहीर पाठिंबा दिला आहे. सोबतच ओबीसी कार्यकर्ते व ओबीसी विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठींबा द्यावा, असे आवाहन करण्यात येते.
यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रभारी संतोष ताठे, अहमदनगर जिल्हाप्रभारी रामदास डोईफोडे, सिनेट सदस्य आनंद वाघ, उल्हास ढेपले, अंबादास गीते, महेंद्र बारवाल, संजय देव्हरे, संजय बुचूडे, विजय ढाकरे, अनिल निलंगे, चंद्रकांत सूक्ते, पांडुरंग बाचकर,दिलीप गोरे, कैलास व्यवहारे, श्रीराम काथार, जगन ढोके, रमेश नप्ते, अनिल काळे, गणेश धनवई, महावितरणचे अण्णा ताठे, आदी ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
महाज्योतीच्या योजनेसाठी २०२२ मध्ये अर्ज केलेल्या संशोधकांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आली. व १२२६ विद्यार्थ्यांना अवॉर्ड लेटर सुद्धा प्रदान करण्यात आले. २०२२ च्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याची प्रोग्रेस रिपोर्ट व इतर प्रमाणपत्र/अधिछात्रवृत्ती जमाकरण्यासाठी जानेवारी महिन्यात मागवली होती. तरी आता ६ महिने उलटून एकही संशोधकाला अधिछात्रवृत्ती भेटली नाही. उपमुख्यमंत्री यांनी स्वतः अधिवेशना दरम्यान घोषणा केली होती की, आम्ही महाज्योतीच्या सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणार. मात्र, ही घोषणा अजून ही कोरडीच घोषणाच ठरत आहे. सदर उपोषणाला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ, ऑल इंडिया पँथर सेना, सारथी संशोधन कृती समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व अनेक सामाजिक संघटनच्या सदस्यांनी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला आहे. तर राष्ट्रवादीचे सुनील गव्हाणे यांनी पात्र द्वारे पाठिंबा जाहीर केला. आपण सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात येते.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Post a Comment