Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उन्नत गटात मोडत नसलेल्या विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. परिक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे मोफत टॅब व 6GB दरदिवसा प्रमाणे इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे.
अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:
१. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.
२. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
३. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी
४. जे विद्यार्थी सन २०२३ मध्ये १० वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना १० वी चे प्रवेश पत्र व ९ वी ची गुणपत्रिका जोडावी.
५. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. त्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.
ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
१. ९ वी ची गुणपत्रिका
२. १० वी परिक्षेचे ओळखपत्र
३. आधार कार्ड
४. रहिवासी दाखला
५. जातीचे प्रमाणपत्र
६. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
क. अर्ज कसा करावा.
अर्ज भरण्यासाठी Application for MHT-CET / JEE/NEET 2025 Training यावर क्लिक करून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. व अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
ड. अटी व शर्ती :
१. अर्ज करण्याचा अंतिम दि.३१/३/२०२३ आहे.
२. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
३. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
४. १० वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून १० वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET / JEE / NEET या परिक्षेची तयारी करत असल्याचे हमीपत्र मागविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:
अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक क्र. 0712-2870120/21 ई-मेल आयडी: mahajyotijeeneet24@gmail.com
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Post a Comment