Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी
धुळे : दर तीन वर्षानी नॉन क्रिमिलेअरच्या उत्पन्न मर्यादेत वाढ व्हायला हवी, पण गेल्या सात वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे ही असंविधानिक नॉन-क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी लोकचळवळ उभारू, असे प्रतिपादन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे महासचिव राम वाडीभष्मे यांनी केले.
संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली. ही बैठक धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेचे चेअरमन प्रवीण भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संजय पोतदार व भुपेश वाघ होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलले. उपस्थित सर्वांच्या संमतीने जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर चौधरी, जिल्हा महासचिव पदी न्हानू माळी, जिल्हाउपाध्यक्ष पदी खुशाल चित्ते व जिल्हा सचिव पदी मुरलीधर नानकर यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे बोलताना ते म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना २७% आरक्षण मिळाले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा सहानी निकालात ही असंविधानिक अट घालण्यात आली. मात्र, सरकार त्या निकालाचे पालन करत नाही, व उत्पन्न मर्यादेत वाढ ही करीत नाही. ही सर्वोच्च न्यायालयाचे अवमान आहे, असेही ते बोलले.
हे ही वाचा : बहुजन मंत्रालय बनले मात्र ओबीसी न्यायाच्या तरतुदीला गळती का?
येत्या ९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिंतन शिबिराचे उद्घघाटक मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे नातू प्रा. डॉ. सूरज मंडल हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक शिक्षक सभा, महाराष्ट्रचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके आहेत. या दरम्यान माहिती पुस्तिका व संकेतस्थळाचे (वेबसाईट) प्रकाशन करण्यात येणार आहे. शिबिराचे आयोजन सूतगिरणी चौकातील रेडवेलवेट सभागृह येथे केले आहे, अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली.
शिबिरात ओबीसी, भटके विमुक्त जाती व जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी (शिक्षक-शिक्षकेत्तरसह सर्व) यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी रविंद्र सैंदणे, न्हानू माळी, प्रशांत महाले, ललित वाघ, खुशाल चित्ते, डॉ. भागवत चौधरी, मिलिंद चौधरी, प्रभाकर चौधरी, किशोर माळी, मुरलीधर नानकर, संजय अमृतकर, राकेश जाधव, कमलेश चव्हाण, किरण चौधरी, रविंद्र देवरे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Post a Comment