Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटनेच्यावतीने येत्या ९ एप्रिला छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित चिंतन शिबिराच्या अनुषंगाने चिखली व मेहकर तालुका येथे आढावा बैठीक संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे व जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
दरम्यान दोन्ही तालुक्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यावेळी बुलडाणा जिल्हाउपाध्यक्ष पदी सुनिल धंदर यांची नियुक्ती करण्यात आली. तर चिखली तालुकाध्यक्ष पदी राजाभाऊ वायाळ आणि मेहकर तालुकाध्यक्ष पदी गणेश पराड यांची नियुक्ती करण्यात आली.
हे वाचा ः बहुजन मंत्रालय बनले मात्र ओबीसी न्यायाच्या तरतुदीला गळती का?
येत्या ९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या चिंतन शिबिराचे उद्घाघटक प्रा. डॉ. सूरज मंडल (दिल्ली विश्वविद्यालय व बी. पी. मंडल यांचे नातू) हे आहेत. या चिंतन शिबारामध्ये दोन्ही तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे व जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बुलडाणा तालुकाध्यक्ष गजानन पडोळ, मुरलीधर टेकाळे, विठ्ठल इंगळे, प्रविण वायाळ, राम वाघ, संजय घायवट, कैलास डुकरे, गणेश खेडेकर, समाधान बंगाळे, जिवन शेटे, समाधान वाघमारे, सोमकांत साखरे, रामप्रसाद आरमाळ, हृषिकेश माळोदे, संदीप पाटील, अनिल सवडतकर, रघुवीर लहाने, कलीम पटेल, समाधान परिहार, गजानन टेकाळे, समाधान गवई, भूषण तुपकर, संदिप रहाटे, रविन्द्र जवंजाळ, भूषण लहाने, अमोल मते, किरण खेडेकर, प्रदीप शेळके, विशाल जवंजाळ, सचिन पागोरे, सदाशिव कुलसुंदर, ज्ञानेश्वर शिंगणे, दिपक राजेगावकर यांची उपस्थिती होती.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Post a Comment