Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी
मुक्ताईनगर : मंडल आयोगाने केलेल्या शिफारशींच्या माध्यमातून मिळालेल्या संविधानिक अधिकारासाठी ओबीसीनी एकत्र येण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने येत्या ९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे यांनी केले.
जळगाव जिल्हाच्यावतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलले. पुढे ते म्हणाले की, मंडल आयोग लागू होऊन ३० वर्ष झालीत परंतु, मंडल आयोगाची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. व पदोन्नती आरक्षण मिळाला नसून अनुशेष मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत, त्याकरिता ओबीसींनी संघटनात्मक एकत्र येणे गरजेचे आहे, असेही ते बोलले.
चिंतन शिबिराचे उद्घघाटक मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे नातू प्रा. डॉ. सूरज मंडल हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक शिक्षक सभा, महाराष्ट्रचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके आहेत. शिबिरा दरम्यान माहिती पुस्तिका व संकेतस्थळाचे (वेबसाईट) प्रकाशन करण्यात येणार आहे. शिबिराचे आयोजन सूतगिरणी चौकातील रेडवेलवेट सभागृहात केले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
शिबिराला ओबीसी, भटके विमुक्त जाती व जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी (शिक्षक-शिक्षकेत्तरसह सर्व) यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय दुट्टे, श्यामकांत रुले, प्रमोद दुट्टे, नितीन जंगले, राजेंद्र कपले, राजेंद्र दुट्टे, कांशीराम चिम, सुनील धोरण(कृषी), नितीन लोखंडे, रमेश सुरवाडे आदी उपस्थित होते.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Post a Comment