Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
आजच्या युगात कौशल्य विकास ही रोजगार मिळवण्याची सर्वात महत्त्वपूर्ण गुरुकिल्ली बनली आहे. शैक्षणिक पात्रतेसोबत टेक्निकल किंवा नॉन-टेक्निकल कौशल्ये असतील तर रोजगाराच्या असंख्य दारे उघडतात. ह्या वास्तवाची जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत एक प्रभावी कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार योजना राबविली जात आहे.
ही योजना विशेषतः इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) युवक–युवतींसाठी आहे. 18 ते 45 वयोगटातील नॉन-क्रिमीलेअर उमेदवारांना नामांकित प्रशिक्षण संस्थांमधून मोफत प्रशिक्षण व प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे हा योजनेंचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचा उद्देश फक्त प्रशिक्षण देणे नाही, तर उमेदवारांना उद्योग-व्यवसायात थेट रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. प्रशिक्षण राष्ट्रीय स्तरावरील मानकांनुसार दिले जाते.
● प्रशिक्षण NSDC (National Skill Development Corporation) ने निश्चित केलेल्या निकषांनुसार
सेक्टर स्किल कौन्सिलमार्फत टेक्निकल व नॉन-टेक्निकल कोर्सेस
● प्रशिक्षण कालावधी 2 ते 12 महिने
● निवासी किंवा अनिवासी दोन्ही प्रकारांतील प्रशिक्षण पर्याय
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 5
Post a Comment