Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी :
कोविद्ध-१९ (कोरोना) च्या पार्श्वभूमीवर मार्च, २०२० पासून शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसलेल्या उमेदवारांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्रे मिळविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे, उमेदवारांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याने आयोगाच्या मुलाखती दरम्यान सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या वर्षाचे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची मागणी न करता, सन २०२१-२०२२ व सन २०२२-२०२३ या वर्षांचे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे, या संबंधाने शासन निर्णय काढण्यात आला.
यामध्ये, ज्या उमेदवारांना नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या कारणास्तव मुलाखतीच्या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. अशा उमेदवारांना मुलाखतीची संधी देण्यात येणार असल्याचे नमूद आहे. पूर्व परीक्षेच्या आधीचे मागील वर्षाचे उत्पन्न गृहीत धरुन नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र जमा करणेबाबत सध्याचे नियम आहेत. ज्या उमेदवारांनी या प्रमाणे मागील वर्षाचे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र जमा केले आहेत. त्यांच्याबाबत या शासन परिपत्रकामध्ये कोणतेही बदल नाहीत.
तथापि, ज्या उमेदवारांना पूर्व किंवा मुख्य लेखी परीक्षेच्या अगोदर कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र काढणे शक्य झाले नाही. परंतु मुलाखतीच्या किंवा ज्या परीक्षेकरीता मुलाखत हा टप्पा लागू नाही, अशा उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या आर्थिक वर्षाचे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र काढलेले आहेत. असे प्रमाणपत्र संबंधित मुलाखतीस किंवा कागदपत्र पडताळणीसाठी ग्राह्य धरण्यात यावे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Post a Comment