Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
ओबीसींनी संघटीतपणे संघर्ष केल्यास सत्ताधीश बनने शक्य
सुशीला मोराळे : राज्य अधिवेशनाचा समारोप
संघटना प्रतिनिधी, छ.संभाजीनगर
ओबीसींनी गटातटात न विभागता एकत्र येऊन संघटीतपणे संघर्ष केल्यास, राजकीय सत्ताधीश बनने शक्य आहे, असे मत ज्येष्ठ ओबीसी नेत्या सुशीला मोराळे यांनी व्यक्त केले.
भारतीय पिछडा शोषित संघटनेच्यावतीने दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले होते. त्यावेळी समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलल्या.
या वेळी मंचावर डॉ. प्रभाकर गायकवाड, सविता हजारे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवर, डॉ. प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे, डॉ. कालिदास भांगे, विभागीय अध्यक्ष प्रा. सुदाम चिंचाणे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य विलास काळे, प्रबोधनकर अरविंद माळी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, फुले,शाहु, आंबेडकरवादी ओबीसी नेतृत्वच खर्या अर्थाने शोषित, पीडीत, गोरगरीब जातसमुहांना समतेने व सन्मानाने जगता येईल, अशा पद्धतीची रचना अंमलात आणू शकतो. ओबीसी सोबत सर्वांची जातीनिहाय जनगणना केल्यास खरी परिस्थिति समोर येईल. व त्यानुसार ओबीसीसाठी अर्थसंकल्पात तरतुद करावी लागेल, असे त्या म्हणालेत.
कार्यक्रमाचे संचालन राजू पोपळघटयांनी केले. तर आभार देवराज दराडे यांनी मानले. डॉ वसंत हारकळ, जनार्दन कापूरे, प्रभाकर गायकवाड, गणेश भुजबळ, आर. के. निरपणे, विश्वनाथ कोकर ,राजीव पोपळघट ,रमाकांत तिडके, शरद बोरसे, बालाजी मुंडे, हनुमान वानकर, रामकिशन मुंडे, अतिश मेहञे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Post a Comment